छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सौजन्याची आत्महत्या, सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सौजन्या हिने आत्महत्या केली आहे. अभिनेत्री बंगळुरुतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 30 सप्टेंबरला सकाळी सौजन्या हिचा मृतदेह पोलिसांना राहत्या घरात आढळला. यामुळे कन्नड टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

सौजन्या ही कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. सौजन्याने वयाच्या 25 व्या जगाचा निरोप घेतल्याने सहकलाकारांसह तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. पोलिसांना तिच्या घरात एक सुसाईड नोटही सापडली आहे. यात तिने आपल्या पालकांची माफी मागितली आहे.

सौजन्या हिने तीन पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यात तिने हे पाऊल उचलल्याबद्दल पालकांची माफी मागितली आहे. या सुसाईड नोटवर 27, 28 आणि 29 सप्टेंबर अशी तारीखही लिहिलेली आहे. सौजन्या हिने तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, असे पोलिसांनी म्हटले आहे.

तिच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही इंडस्ट्रीतील आव्हाने आणि खराब तब्येत यामुळे ती त्रस्त होती. सुसाईड नोटमध्ये देखील सौजन्याने आरोग्याच्या समस्येमुळे त्रस्त असल्याचे नमूद केले आहे. तसेच हे पाऊल उचलायचे नव्हते, मात्र आता हा त्रास अधिक सहन होत नसल्याचेही तिने यात म्हटले.