कन्नमवारनगरमध्ये नाल्याचे बांधकाम ऑक्टोबरपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विक्रोळी येथील कन्नमवारनगरमध्ये इमारत क्रमांक 46 ते 168 पर्यंत नाल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या ठिकाणी भिंतही उभारण्यात येणार असून नाल्याची साफसफाईही करण्यात येणार आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात येथील नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

कन्नमवारनगर येथील नाला आणि नाल्याची साफसफाई करण्यासोबतच विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी महापौर दत्ता दळवी, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत, महिला उपविभाग संघटक रश्मी पहुडकर, डॉ. राजेश वैद्य उपस्थित होते. आमदार सुनील राऊत यांच्या कार्यालयात याच मुद्दय़ावर याआधी झालेल्या बैठकीत पालिका अधिकाऱयांनी नाला बांधण्याबाबत आश्वासन दिले होते. ऑक्टोबरपासून नाल्याची भिंत उभारण्यास सुरुवात होईल, असे पालिका अधिकाऱयांनी सांगितले. तसेच नाल्याच्या बांधकामात अडथळा ठरणाऱया कांदळवनाची छाटणी करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱयांनी परवानगी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.