मला ट्विटरवर केस करायची आहे, कपिल शर्माने व्यक्त केला संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कॉमेडी किंग’ अशी ओळख बनवलेल्या कपिल शर्माने आता ओटीटीवरही धम्माल उडवायला सुरुवात केली आहे. आपल्या जीवनात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना त्याने या कार्यक्रमात सर्वांसमोर त्याच्या शैलीत मांडल्या आहेत. त्यामध्ये ट्विटवरून झालेल्या वादावेळची कहाणीही कपिलने सांगितली आहे. मला ट्विटरवर केस करायची आहे, असेही तो म्हणाला आहे. ज्याबद्दल सगळ्यांनाच जाणून घ्यावेसे वाटत आहे.

कपिल त्याचा स्टँडअप कॉमेडी शो ‘आय एम नॉट डन येट’ घेऊन आला आहे आणि त्याने दाखवून दिले आहे की आपण या कलेमध्ये निष्णात आहोत. पण यावेळी कपिल शर्माने ‘कॉमेडी पंच’साठी स्वत:चे आयुष्य आणि स्वत:शी संबंधित वादांची निवड केली आहे. कपिल शर्माने हा 54 मिनिटांचा कार्यक्रम अतिशय मनोरंजक पद्धतीने पार पाडला आहे आणि तो त्याच्या विनोदाने प्रेक्षकांसमोर त्याच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उलगडत जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिल शर्माचा ‘आय एम नॉट डन येट’ त्याच्या कट्टर चाहत्यांना नक्कीच आवडणार आहे कारण यामध्ये कपिल शर्माने त्याच्या वैयक्तिक आयुष्याची खिल्ली उडवली आहे. मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंधित ट्विट असो किंवा नैराश्याशी त्यांची लढाई असो. एवढेच नाही तर कपिल शर्माने त्याचे वडील, त्यांचे इंग्लिश आणि गिन्नीसोबतच्या लग्नाचीही खिल्ली उडवली आहे. अशा प्रकारे या संपूर्ण शोमध्ये कपिल शर्मा आणि त्याचे आयुष्य एकत्र जाते.

कपिल शर्माने वडिलांची कॅन्सरशी केलेली लढाई आणि त्यांच्याशी झालेला संवादही हृदयस्पर्शी पद्धतीने मांडला आहे. गिन्नी सोबतच्या लग्नाची एक मजेदार घटनाही समोर आली आहे. कपिल शर्माचा हा प्रयत्न गमतीशीर आहे. अर्थात त्याची शैली जुनीच आहे पण विनोदात नवीनता आहे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे सर्व काही आहे.