कराड – ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रे केंद्रावर पाठवण्याची तयारी पूर्ण

कराड तालुक्‍यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे तपासणी आणि मतदान केंद्रावर पाठवायची मतदान यंत्रे तयार करण्याची अंतिम कार्यवाही करण्यास प्रारंभ झाला आहे. तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतीसह 104 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.

कराड तालुक्‍यातील उंडाळे, कामथी, किरपे, येणके, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, म्हारुगडेवाडी, टाळगाव, भुरभुशी, अंबवडे, खोडजाईवाडी, पाचुंद, गोटे, वसंतगड, हणबरवाडी, विरवडे या 17 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. याबराेबरच 30 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी, तर काही ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी लढत होत आहे.

मतदान यंत्रे तपासणी आणि मतदान केंद्रावर पाठवायची मतदान यंत्रे तयार करण्याची अंतिम कार्यवाहीस प्रारंभ झाला. यासाठी स्वतंत्र मशिनची व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी यांची मतदान यंत्रे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अशी माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या