करणने मागितली मधुर भांडारकरांची माफी

दिग्दर्शक मधुर भांडारकर सध्या बॉलीवूड सुपरस्टार्सच्या पत्नींवर आधारित ’बॉलीवूड वाईक्ज’ या चित्रपटाची निर्मिती करतायत. मात्र, याच दरम्यान निर्माते करण जोहर आणि अपूर्व मेहतांनी ’फॅब्युलस लाईक्ज ऑफ बॉलीवूड वाईक्ज’ या सीरिजची घोषणा केली आहे. या सीरिजच्या नावावरून मधुर भांडारकरांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर आता करण जोहरने पोस्ट शेअर करत मधुर भांडारकर यांची माफी मागितली आहे. पोस्टमध्ये करण म्हणाला, ‘माझ्या सीरिजची कथा, फॉरमॅट आणि टायटल पूर्णपणे वेगळे आहे. या सीरिजचा तुझ्या चित्रपटावर परिणाम होणार नाही.’

आपली प्रतिक्रिया द्या