
निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने नुकताच आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला. या दरम्यान त्याच्याबाबतीत एक वेगळीच बातमी लक्ष वेधून घेत आहे.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत करणने आपल्याला वेळीच लग्न करायला हवं होतं, असं विधान केलं आहे. तो म्हणाला की, आता मला खरंच पश्चात्ताप होतो की मी माझ्या व्यवसायाला जास्त प्राधान्य दिलं आणि आजही देतो आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्याला मी फारसं महत्त्व दिलं नाही. मी वेळीच लग्न केलं असतं तर फार बरं झालं असतं, असं करण या मुलाखतीत म्हणाला आहे.
2015मध्ये करण सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचा पिता झाला. आपल्या याही अनुभवाबाबत तो म्हणाला की, मी आज एक पिता म्हणून खूपच समाधानी आहे. मी बाप होऊ शकलो, हे एक बरं झालं. मी वेळीच सरोगसीचा निर्णय घेतला हा एक चांगला निर्णय होता. पण, लग्नाच्या बाबतीत मात्र मी पाच वर्षं उशीर केला. जर मी आधीच केलं असतं, तर फार बरं झालं असतं. चित्रपटांची निर्मिती आणि स्टुडिओच्या निर्मितीत मी इतका व्यग्र होतो की माझ्या खासगी आयुष्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता, असं करण या मुलाखतीत म्हणाला.
सध्या करण हा त्याच्या कॉफी विथ करणच्या पुढच्या सीझनच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर दुसरीकडे रॉकी और रानी की प्रेम कहानी या त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरणही जोमात सुरू आहे.























































