
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुड न्यूज दिल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने पुन्हा एकदा बाबा होणार असल्याचे सांगितले. या अभिनेत्याला आधी दोन जुळ्या मुली असून तो दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. करणवीर बोहरा असे त्या अभिनेत्याचे नाव असून त्याने एकदम वेगळ्या प्रकारे ही आनंदाची बातमी दिली आहे.
करण व त्याची पत्नी तिजे सिद्धू यांनी इंस्टाग्रावर एक फोटो शेअर केला आहे. त्या ते दोघे मातीचा छोटा बाहुला तयार करताना दिसत आहेत. त्या सोबत करणवीरने एक मेसेज लिहला आहे. ‘आपल्यामुळे मुलं या जगात येतात पण त्याची योजना पूर्णपणे देवाच्या हातात असते. आपण फक्त एक निमित्त असतो. देवा आम्हाला दिलेल्या सरप्राईजबद्दल तुझे धन्यवाद. आम्ही खूप आभारी आहोत. त्याने पुन्हा एकदा आई वडिल होण्यासाठी आम्हाला निवडले आहे. हे आतापर्यंतचे वाढदिवसाचे सर्वात सुंदर गिफ्ट होते’, अशी भावनिक पोस्ट त्याने शेअर केली आहे.
विराट अनुष्काने दिली गुड न्यूज; नवीन पाहुणा येणार
दोन दिवसांपूर्वी विरुष्का म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गुड न्यूज दिली. विराट कोहली याने आपल्या अधिकृट हँडलवर दोघांचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर ‘And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️ ‘ अशी टॅग लाईनही दिली आहे. विराटच्या ट्वीटवर अक्षरश: शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.






























































