गळ्यात साप घालून आली करिना, हटके लूकची जबरदस्त चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री करिना कपूरचा आज एक हटके लूक समोर आला आहे. यात तिने सापाच्या डिझाईनचा नेकलेस घातला असून त्याची किंमत एखाद्या लक्झरी कारपेक्षाही जास्त आहे. तिच्या या हटके नेटपिसची संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये चर्चा होत आहे.

करिना ही झी टीव्हीवरील डास इंडिया डासची जज असलेले करिना या शोच्या फिनालेला बेबी पिंक रंगाचा बॉडी हगिंग गाऊन घालून आली होती. त्या गाऊनसोबत तिने गळ्यात सापाची डिझाईन असलेला नेकलेस घातला होता. त्या नेकलेसची बिटाऊनपासून नेटकऱ्यांमध्ये जबरदस्त चर्चा आहे. या छोट्याशा नेकलेसची किंमत तब्बल 38 लाख रुपये आहे.