….आणि या अभिनेत्रीला करावा लागला विमानतळावरच मेकअप, व्हिडीओ व्हायरल

1192

चित्रपटाच्या शुटींगदरम्यान कलाकारांना अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तयार व्हावे लागते. कधी बागेत, कधी रस्त्यावर तर कधी ओसाड ठिकाणी. पण शनिवारी अभिनेत्री करिना कपूरला शूटींग नसतानाही चक्क बंगळुरू विमानतळावर मेकअप करावा लागला. साक्षात करिनाला सार्वजनिक ठिकाणी मेकअप करताना बघुन तिच्या चाहत्यांना सुखद धक्का तर बसलाच. पण त्यापेक्षा करिनानेही हा मेकअप करतानाचे क्षण एन्जॉय केले.

मेकअप करता करता ती चाहत्यांना हाय बाय पण करत होती. तिचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना भलताच भावला आहे. करिनाने लाईव्ह मेकअपचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टावर पोस्ट केला आहे. करिनाचा आतेभाऊ अरमान जैन याचा शनिवारी मुंबईत रोका होता. पण नवीन चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी असल्याने करीनाला मुंबईत वेळेत पोहचता आले नाही. यामुळे तिने विमानतळावरच मेकअप टीमला तिला तयार कऱण्यास सांगितले. मग काय विमानतळावरच करिना रोका सेरेमनीसाठी तयार झाली. त्यानंतर मुंबईला उतरताच तिने थेट आत्याचे घर गाठले. करीनाच्या या मेकअपचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तिच्या या बिनधास्तपणावर चाहते भलतेच खुश आहेत.


View this post on Instagram

This is how we do it …. Getting ready at the airport for #armaankishaadi @nainas89 @yiannitsapatori @savleenmanchanda

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

आपली प्रतिक्रिया द्या