15 बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, वाचा बहुमतासाठीचे काय आहे गणित?

5335

कर्नाटकमधील काँग्रेस- जनता दल सेक्युलर या पक्षांचे 15 बंडखोर आदारांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यंमत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्या उपस्थितीमध्ये बंगळुरूत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यातील 13 जणांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

याआधी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या काँग्रेस- जनता दल सेक्युलर या पक्षांच्या 17 आमदारांनी बुधवारी धक्का बसला. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्यच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे ते 17 आमदार अपात्रच ठरले. मात्र या आमदारांना निवडणूक लढविण्यास मात्र सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला आहे.

पाच डिसेंबरला पोटनिवडणूक
सर्वोच्च न्यायालयाने 17 आमदारांना अपात्र घोषित केल्यानंतर यापैकी 15 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. पाच डिसेंबरला मतदान आणि 9 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. आता बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांनाच तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे.

काय आहे गणित?
कर्नाटकात 224 विधानसभा जागा आहेत. यातील 17 आमदारांना अपत्र ठरवण्यात आल्याने 207 जागा राहिल्या. बहुमतासाठी 104 च्या आकड्याची आवश्यकता आहे. सध्या भाजपने एका अपक्ष आमदाराच्या पाठिंब्या सरकार स्थापन केले आहे. आता पाच डिसेंबरला 15 जागांसाठी पोटनिवडणूक होईल, तर मस्की आणि राजराजेश्वर नगर विधानसभा जागांचे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे तेथे पोटनिवडणूक लागलेली नाही. 15 जागांवर आता मतदान पार पडल्यानंतर विधानसभेच्या जागा 222 (207 +15) होतील. त्यामुळे बहुमताचा आकडा 111 होईल. भाजपला भाजपकडे सध्या 105 आमदार असून सत्तेत कायम राहण्यासाठी आणखी 6 आमदारांची आवश्यकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या