
महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ज्या ट्विटर हँडलवरून ते हँडल बनावट असल्याचा दावा केला जातोय. मात्र हा दावा खोटा असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. हे ट्विटर हँडल बनावट असतं तर ते तेव्हाच डिलीट का नाही केलं? असा सवाल चव्हाण यांनी केला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. अधिवेशन परिसरात अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. बसवराज बोम्मई यांच्या ट्विटर हँडलवरील ट्विटचे प्रिंट त्यांच्या हातात होते. त्यातील संदर्भ देत चव्हाण यांनी कर्नाटक सरकारविरोधात आरोप केले.


























































