
जनतेला विकास हवा आहे. देव-धर्माच्या नावावर राजकारण नको. देव-धर्म ही वैयक्तिक आस्थेची बाब आहे. त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कराल तर उपरवाले की लाठी में आवाज नहीं होती, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेसला समाजाच्या सर्व थरांतून पाठिंबा मिळाला. हा विकासाचा आणि एकतेचा विजय आहे. रोजगार, महागाई, सुरक्षा, शांतता, विकास हेच जनतेचे प्रमुख मुद्दे आहेत. काँग्रेसने लोककल्याणकारी योजनांचा जाहीरनामा मांडला. त्यातील आश्वासने एका वर्षात पूर्ण करण्याचा शब्द दिला आणि लोक काँग्रेसच्या पाठीशी उभे झाले, असे ते म्हणाले.

























































