
छोट्या छोट्या गोष्टींवरचा राग मोठ्या नुकसानाचे कारण बनतो. कर्नाटकातील एका व्यक्तीने बँकेवर नाराजी व्यक्त करत असे पाऊल उचलले की त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे आणि त्याचवेळी पोलिसांनी त्याच्यावर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील एका व्यक्तीने रविवारी बँकेला आग लावली. कर्ज अर्ज फेटाळण्यात आल्याने आरोपी संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, त्याच्याविरुद्ध कलम 436, 477 आणि 435 अंतर्गत कागिनेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला कर्जाची गरज होती, त्यासाठी त्याने बँकेशी संपर्क साधला होता. मात्र, बँकेने त्यांचा कर्ज अर्ज फेटाळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कर्ज अर्ज फेटाळण्यात आला.
बँकांकडून कागदपत्रे आणि इतर काही बाबींची छाननी केली जाते, त्यानंतरच कर्ज स्वीकारले जाते. याप्रकरणी पोलीस आता आरोपीची चौकशी करत आहेत.




























































