ACच्या स्फोटात जोडप्यासह चिमुकल्यांता दुर्देवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एसीच्या स्फोटात एका कुटुंबाचा गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कर्नाटकातील विजयानगर जिल्ह्यातील मरीयम्मानाहल्ली गावात आज पहाटे घडली आहे. मृतांमध्ये जोडप्यासह दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

वेंकट प्रकाश, त्यांची पत्नी आणि मुलं झोपली असताना त्यांच्या खोलीतील एसीचा अचानक स्फोट झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसीमधील गॅस गळती होऊन शॉर्ट सर्कीट झाल्याने हा स्फोट झाला आहे. अवघ्या मिनीटाभरात आग घरभर पसरली. मात्र खोलीत असलेले वेंकट प्रकाश आणि त्यांचं कुटुंब आगीमुळे बाहेर पडू शकले नाही आणि गुदमरून त्यांचा खोलीतच मृत्यू झाला.स्फोटात गुदमरुन मृत्यू झालेल्यांमध्ये वेंकट प्रशांत (42), पत्नी डी.चंद्रकला (38), मुलगा अद्विक (6) आणि मुलगी प्रेरणा (8) अशी नावे आहेत. तर बाहेर झोपलेले दुसरे दाम्पत्य तिथून बाहेर पडले आणि बचावले.

पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर ते फायरब्रिगेडसह घटमनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.