मराठा जनआंदोलनास राजपूत करणी सेनेचा पाठींबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा क्रांती राज्यव्यापी जनआंदोलनास श्री राजपूत करणी सेना (महाराष्ट्र) या संघटनेने जाहीर पाठींबा दिला आहे. येथील मराठा क्रांती भवनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची भेट घेऊन त्यांना पाठींब्याचे पत्र दिले आहे.

महाराष्ट्रात मराठा समाजाने सदैव थोरल्या भावाची भूमिका बजावली आहे. आज या समाजाची आर्थिक व सामाजिक स्थिती मागास होत चालली आहे. त्यामुळे त्यांची आरक्षणाची मागणी रास्त आहे. लोकशाही मार्गाने ५८ मूक मोर्चे काढुनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. यापुढे सरकारने ही मागणी मार्गी न लावल्यास राजपूत करणी सेना मराठा समाजास थोरला भाऊ म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन साथ देईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विरेंद्रसिंह चौहान यांच्याबरोबर अनेक नामवंत उपस्थित होती.

summary…karni sena gave support to maratha morcha