शिवसेनाप्रमुखांची शिकवण शेवटपर्यंत सोडणार नाही! करवीरमधील शिवसैनिकांची वज्रमूठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

‘कितीही संकटे येऊ द्या, कोण कितीही फुटून जाऊ दे, शेवटपर्यंत शिवसेनाप्रमुखांची शिकवण सोडणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची साथ कधीच सोडणार नाही. पिढय़ान्पिढय़ा आम्ही त्यांच्यासोबत राहून देतील तो आदेश पाळू,’ असा निर्धार आज करवीर शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव फाटा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भव्य फलक उभारण्यात आला आहे. यावेळी शिवसैनिकांसह ग्रामस्थांनीही वज्रमूठ करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचे वचन दिले.

पोपट दांगट, दीपक पाटील, विक्रम चौगुले, शरद माळी, संतोष चौगुले, विनायक जाधव, बाबूराव पाटील, सागर पाटील, बंडू घोरपडे, धनाजी सुतार, सचिन नागटिळक, बाळासाहेब नलवडे, कैलास जाधव, योगेश लोहार, दीपक पोपटाणी, सुनील पारपाणी, किशोर कामरा, शैलेश पवार, दत्ता फराकटे, पवन गजवाणी, राजू राठोड, शशिकांत पाटील, अभिजित थोरात, आनंद जाधव, गौरव धनवडे, सुभान फुलवाले, सूरज मिस्त्र्ााr, मोहन आवळे, अनिल माळी, इमाम पठाण, अमिर शेख, मुस्तक पठाण, जुबेर गोलंदाज, दाऊद तसीलदार, तौफिक पठाण, उल्फत मुल्ला, रफिक देवळे, नजीर शेख, मुजाहिद्द खाटीक, शैलेश खाटीक, पप्पू परविक, रज्जाक खलीफ, फिरोज खाटीक, अश्फाक खाटीक आदी उपस्थित होते.