वाराणसीमध्ये देवीदेवताही प्रदूषणाच्या विळख्यात, मूर्तींना मास्क लावून पुजा

571

देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली व उत्तर प्रदेशमध्ये प्रदूषणाने उच्चांक पातळी गाठली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही हवा प्रदूषित झाली आहे. संपूर्ण वाराणसी शहरावर धुलीकणांनी भरलेले धुके पसरल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. यापार्श्वभूमीवर देवी देवतांना प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावरही मास्क लावण्यात आला आहे.

वाराणसीतील सिगरा येथील मंदिरात महादेवासह सर्वच देवी देवतांच्या मूर्त्यांना मास्क लावण्यात आला आहे. मंदिराचे पुजारी हरीश मिश्र यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. मास्क घातलेल्या मूर्तिचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देवाला प्रदूषणापासून दूर ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनाने मूर्त्यांना घातलेल्या मास्कची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. दरम्यान, मंगळवारी कानपुरचे शुद्ध हवेचे क्वालिटी इंडेक्स 453 होते. तर लखनौचे 416 होते.

आपली प्रतिक्रिया द्या