कश्मीरमधील धार्मिक शाळा सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर, 13 विद्यार्थी अतिरेकी संघटनेत दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील एक धार्मिक शाळा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आली आहे. या शाळेत शिक्षण घेतलेले 13 विद्यार्थी वेगवेगळ्या अतिरेकी संघटनांमध्ये सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुलवाम येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेला अतिरेकी सज्जाद भट यांच्याबाबत चौकशी करत असताना ही माहिती समोर आली आहे.

पुलवामा हल्ल्याशी संबंधित असलेल्या सज्जादनेही याच शाळेतून शिक्षण घेतले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सखोल तपास केला असता या शाळेतील एपूण 13 विद्यार्थी अतिरेकी संघटनांमध्ये सामील झाल्याचे उघड झाले आहे. अतिरेक्यांचा प्रभाव असलेल्या अंतनाग, शोपिया, पुलगाम, पुलवाम या जिल्ह्यातील विद्यार्थी  येथे शिक्षण घेत आहेत. अल बदर चा कमांडर जुबेर नेगरु, हिजबुलचा निजाम नजीर डार, एजाज अहमद यांनीही येथेच शिक्षण घेतलेले आहे.

तसेच याच शाळेत शिकणारा बारामुल्लाचा एक विद्यार्थी घरी गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. तो नंतर दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी या शाळेवर कारवाई करण्याची तयारी केली असून संबंधित विद्यार्थ्यांची यादी पेंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवली आहे.