कासीम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, 35 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झालेले इराणचे मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी झाली असून यात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत.

कासीम यांची अंत्ययात्रा मंगळवारी केरन येथील त्यांच्या निवासस्थानातून निघाली होती. इराणमध्ये सुलेमानी हे लोकप्रिय असल्याने दहा लाखांपेक्षा जास्त नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमले होते. यावेळी आपल्या लाडक्या मेजरला शेवटचा निरोप देण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. गर्दीमुळे लोकांना चालणेही अशक्य झाले होते. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत अनेकजण खाली पडले आणि इतरांच्या पायाखाली तुडवले गेले. यात 35 जणांचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला तर 48 जण जखमी झाले आहेत.  सुलेमानी यांचा दफनविधी होण्यापूर्वीच चेंगराचेंगरीची ही घटना घडली.