‘ही’ मराठमोळी अभिनेत्री अक्षय कुमारसोबत करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता हृतिक रोशन याच्या आगामी ‘सुपर 30’ या चित्रपटातून मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मृणालपाठोपाठ आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री बॉलिवूडमघील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. अक्षय कुमार याचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असलेला ‘मिशन मंगल’ या आगामी चित्रपटातून अभिनेत्री कश्मिरा परदेशी ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच कश्मिराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर खिलाडी अक्षयसोबतचा फोटो शेअर केला आहे.

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट मिशन मंगल या चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू व सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्री दिसणार आहेत. मात्र आता या चित्रपटात कश्मिरा परदेशीला देखील संधी देण्यात आली आहे. कश्मिरा परदेशीने याआधी ‘नरथानासला’ या तेलुगू चित्रपटात काम केले आहे. तर मिशन मंगल हा तिचा दुसरा चित्रपट ठरणार आहे.

View this post on Instagram

L u c e n t ✨ 1/5 PC @nataliaarantseva Make up @pooja.d_makeupartist #nataliaarantseva #portraitphotography #portrait #portrait_vision #kashmira #kashmirapardeshi #indianportraits #imgmodels #portraitpainting

A post shared by Kashmira (@kashmira.pardeshi) on

‘मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने मी अगदी भारावून गेले आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला अक्षय कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तसेच या चित्रपटात काही आघाडीच्या अभिनेत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत आपल्या अभिनयाची चमक दाखवणे माझ्यासाठी कठीण ठरणार आहे. पण हा अनुभव मला बरंच काही शिकवून जाईल’, असे कश्मिराने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.