होतकरू नर्तकी

52

नृत्य हा तिचा आनंद आहे, पण आपली कला दुसऱ्यांना देण्यासाठी मनाली कुलकर्णी ही डोंबिवलीची मुलगी धडपडतेय.

शास्त्रीय नृत्याकडे कुणी वळत नाही. त्यामुळे शास्त्रीय नृत्यासाठी कार्यरत राहणार आहे. त्यातून खास म्हणजे कथ्थक नृत्याला प्राधान्य देणार आहे. वैशाली दुधे आणि वैशाली वाळुंजकर या माझ्या गुरूंनी जे दिले ते इतर मुलींना देणार आहे.

 नृत्यालंकार वैशाली दुधे यांची शिष्या नृत्यालंकार मनाली कुलकर्णी ही कथ्थक केवळ नृत्य शिकली नाही, तर आपली कला आपल्यासारख्याच इतर मुलींमध्ये पसरवत आहे. त्यासाठी तिने डोंबिवलीत ‘नृत्यश्री कथ्थक नृत्यालय’ सुरू केले आहे. याच संस्थेला 5 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘संगीतमुच्यते’ हा कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. यात मनालीने धमार तालात एकल नृत्य सादर केले आहे. यात व्यसनाधीन नवऱ्याला व्यसनमुक्त करून शास्त्रीय नृत्यकलेचं वेड लावून घ्यायला भाग पाडणाऱ्या नायिकेची भूमिका साकारत तिने व्यसनमुक्तीसारख्या विषयाला हात घातला आहे.

मनालीला नृत्याची लहानपणापासूनच आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासून ती डान्स करतेय. ती सांगते, आाईबाबांनी मला आधी शिक्षण पूर्ण करायला सांगितलं. म्हणून मी बी.कॉम. झाले. मग कथ्थकमध्ये ‘नृत्यालंकार’ ही पदवी गांधर्व महाविद्यालयातून घेतलीय, असंही तिने स्पष्ट केलं. एकटीच्या बळावर डान्स क्लास चालवणं ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. पण मनाली ते करतेय. याबाबत ती म्हणते, एकटीने डान्स क्लास चालवतेय खरी, पण मला काही मुलींची खूप मदत होतेय. पण आईबाबांची खूप मदत होते. त्यांच्याबरोबरच मोठय़ा भावाचाही तिला खूप पाठिंबा होता. अजूनही आहे, असं ती स्पष्ट करते. घरातल्यांचा प्रचंड सपोर्ट असल्यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो असं ती आवर्जून सांगते. आईचाही सपोर्ट मला महत्त्वाचा वाटतो. कारण मी कुठेही जाते तेव्हा ती माझ्यासोबतच असते.

आपली प्रतिक्रिया द्या