
विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांची ही जोडी सोशल मीडियावर दिसते. पण यावेळी दोघेही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. खरंतर व्हायरल व्हिडिओमध्ये कतरिनाने घातलेल्या ड्रेसमुळे तिच्याबद्दल अनेक चर्चा घडताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे कतरीना प्रेग्नेंट आहे का यावर सर्वाधिक चर्चा घडू लागली आहे.
व्हिडिओमध्ये दोघेही मुंबईहून अलिबागला जाताना दिसत आहेत. कतरिनाने सैल पांढरा शर्ट आणि पँट घातली होती, तर विकी कॅज्युअल लूकमध्ये दिसत होता. दोघांचेही चेहरे मास्कने झाकलेले होते. हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांच्या नजरा थेट कतरिनाच्या ड्रेसवर गेल्या. सोशल मीडियावर कतरिना गरोदर असल्याच्या चर्चांना आता चांगलेच उधाण आलेले आहे.
परंतु काहीजण मात्र हा व्हिडिओ जूना असल्याचे देखील बोलत आहेत. मार्चमध्येही कतरिना एका लग्नाला उपस्थित होती तेव्हा तिने विकी कौशलच्या नावाचा टॅटू खांद्यावर गोंदवून लोकांची मने जिंकली होती. तोच हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे.
डिसेंबर 2021 मध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफचे लग्न झाल्यानंतर, कतरिना गरोदर असल्याच्या अफवा अनेकदा कानावर आल्या होत्या. यावर विकी आणि कतरिनाने कायमच मौन बाळगणे पसंत केले आहे.
याआधी देखील कतरिना संदर्भात अशा अफवा पसरल्या होत्या. त्यावर विकी कौशलने अतिशय मार्मिक शैलीमध्ये उत्तर दिले होते.
बॅड न्यूज या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान, विकी कौशलला कतरिना गरोदर आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी विकी म्हणाला, आनंदाची बातमी आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला खूप आनंद होईल. पण सध्या तरी, या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. अभी आप बॅड न्यूज एन्जॉय किजिए, जब गूड न्यूज आयेगा तो हम आपके साथ जरूर शेअर करेंगे.