कतरिना कैफ गरोदर? विकीच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vicky kaushal katrina kaif wedding

अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या फारशी कुठेही सक्रिय नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेता विकी कौशलसोबत ती विवाहबंधनात अडकली. त्यानंतर तिचे आणि विकीचे एकत्रित संसाराचे फोटो सोडल्यास ती फारशी कुठे दिसली नव्हती.

आता ती गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी कतरिना ही मुंबई विमानतळावर दिसली होती. त्यावेळी तिचा पेहराव सैलसर होता. तसंच तिचं पोटही सुटलेलं दिसत होतं. वास्तविक कतरिना ही फिटनेसच्या बाबतीत अत्यंत जागरुक असते. त्यामुळे तिचा हा लूक पाहून ती गर्भवती असल्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली.

त्यात विकीने कतरिनाशी लग्न केल्यानंतर आपण आपल्या आयुष्यात सेटल असल्याची जाणीव झाल्याचं म्हटलं. सामान्यतः लग्नानंतर मुलाचा विचार सुरू करणारे पुरुष असं म्हणत असल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली.

पण, विकीच्या प्रवक्त्यांकडून या चर्चांना पूर्णविराम लावण्याबाबत सांगण्यात आलं आहे. ही निव्वळ अफवा असून अद्याप असं काहीही नाही, असं विकीचं म्हणणं आहे.