
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ या रिअॅलिटी शोचा 15 वा सिझन शुक्रवारी संपला आहे. 29 डिसेंबर रोजी या शो चा अखेरचा एपिसोड टेलिकास्ट झाला. शो च्या अखेरच्या भागात शर्मिला टागोर, सारा अली खान आणि विद्या बालन यांनी उपस्थिती लावली होती. या अखेरच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेताना अमिताभ बच्चन भावूक होताना दिसले.
‘कौन बनेगा करोडपती’ च्या या मंचावर अमिताभ बच्चन आपल्या प्रेक्षकांसोबत अनेकदा आपल्या आयुष्यातील मजेशीर किस्से सांगताना दिसतात. तसेच हॉट सीटवर बसलेले स्पर्धक देखील त्यांच्या आयुष्यातील संघर्ष किंवा अनुभव सांगत असतात. कधी कधी हेच स्पर्धक अमिताभ यांच्या समोर भावूक झाल्याचे पाहायला मिळतात. ‘कौन बनेगा करोडपती’च्या 15 व्या सिझनचा अखेरचा भाग शुक्रवारी टेलिकास्ट झाला. त्यावेळी ते भावूक झाल्याचे दिसले.
निर्मात्यांनी त्या क्षणाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, ‘भगिनींनो, मी निरोप घेतोय. उद्यापासून हा स्टेज नसणार. आपण उद्यापासून इथे येणार नाही हे आपल्या प्रियजनांना सांगता यावं, हे सांगण्याची हिंमतही नाही आणि सांगावंसं वाटत नाही. मी, अमिताभ बच्चन, या कालावधीसाठी शेवटच्या वेळी या मंचावरून म्हणणार आहे – शुभ रात्री, शुभ रात्री.
View this post on Instagram
प्रेक्षकांचा निरोप घेताना अमिताभ बच्चन भावूक झाले होते. यावर अनेक युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहीलेय, आम्हाला तुमची आठवण येईल तर अन्य एका युजरने लिहीलेय आम्हाला पुढच्या भागाची प्रतिक्षा आहे.



























































