केबीसीमध्ये 50 लाख जिंकलेल्या तहसीलदार महिलेला अटक, पूरग्रस्तांच्या निधीचा अपहार; बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कौन बनेगा करोडपती या रिऑलिटी शोमध्ये 50 लाख रुपये जिंकून प्रसिद्धी झोतात आलेल्या तहसीलदार अमिता सिंह तोमर  यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली. 2021मधील 2.57 कोटी रुपयांच्या पूर मदत घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

2021मध्ये अमिता सिंह तोमर या श्योपूर जिह्यातील बडोदा तहसील येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. त्या वेळी भीषण पुरानंतर 794 बाधितांना मदत केली जाणार होती. तहसील प्रशासनाने 127 बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करून निधीचा अपहार केला. अनेक बँक खाती तहसील क्षेत्राच्या बाहेरील होती. या प्रकरणात 22 पटवारी आणि अमिता सिंह तोमर यांच्यासह एकूण 23 जणांना अटक झाली. या गुन्ह्यात एकूण 110 जणांना आरोपी करण्यात आले. अमिता सिंह तोमरला ग्वाल्हेर येथील घरातून अटक करण्यात आली.