चंद्रशेखर राव यांनी दुसऱ्यांदा घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
7 सप्टेंबर तेलंगणा विधानसभा बरखास्त

सामना ऑनलाईन । हैदराबाद

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधित जागा जिंकत पुन्हा सत्तेत आला आहे. या विजयानंतर टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज भवनमध्ये झालेल्या सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली.

बुधवारी टीआरएसच्या नेत्यांची व नवनिर्वाचित आमदारांची एक बैठक झाली. या बैठकीत सर्व नेत्यांनी एकमताने चंद्रशेखर राव यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले. या बैठकीतच चंद्रशेखर राव यांच्या शपथविधीची तारिख ठरवण्यात आली होती.

सहा महिन्यांपूर्वीच विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने भाजप व काँग्रेसचा सुपडासाफ करत एक हाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत टीआरएसला 88 जागा तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या. तेलंगणात भाजपचा लाजिरवाणा पराभवा झाला असून त्यांना एका जागेवर समाधान मानावे लागले होते.