केदारनाथ चित्रपटामुळे लव्ह जिहाद वाढेल, मंदिराच्या पुजाऱ्यांची बंदी घालण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । डेहराडून

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही लवकरच केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. पण आता या चित्रपटावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केदारनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटामुळे लव्ह जिहाद वाढू शकतो, त्यामुळे यावर बंदी घाला असे पुजाऱ्यांचे म्हणने आहे.

केदारनाथ या चित्रपटात सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरावर आधारित आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी देखील या पुजाऱ्यांनी आंदोलन करत चित्रीकरण बंद पाडले होते. ‘या चित्रपटातून लव्ह जिहादचे प्रमोशन होत असल्यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या जातील. म्हणून या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी आम्ही केली आहे. जर ती मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही आंदोलन करू’, असा इशारा केदार सभा या पुजाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष विनोद शुक्ला यांनी दिला