हर-हर महादेव! सहा महिन्यांनी घडलं केदारनाथाचं दर्शन

83

सामना ऑनलाईन । डेहराडून 

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी गुरुवारी पहाटे उघडण्यात आला आहे. वैदिक मंत्रोच्चाराच्या गजरात पहाटे 5 वाजून 33 मिनिटांनी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर हजारो भक्तांनी प्रचंड थंड वातावरणातही हर-हर महादेव, बम बम भोलेच्या जयघोषात केदारनाथाचे दर्शन घेतले.

मंदिराचे दरवाजे उघडण्याअगोदर मंदिराचे मुख्य पुजारी रावल भीमाशंकर लिंग यांनी वैदिक मंत्रोच्चाराच्या गजरात विधिवत पूजा अर्चा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक तसेच रुद्राभिषेक करण्यात आला. राज्य सरकारकडून केदारनाथ मंदिराचे प्रवेशद्वार हे विशेष पद्धतीने सजवण्यात आले आहे. उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य तसेच माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही पहिल्याच दिवशी केदारनाथाचे दर्शन घेतले. यावेळी देश – विदेशातील जवळपास अडीच हजार भाविक अपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून  परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या