केईएम रुग्णालयात रुग्णाने गळफास लावून जीवन संपवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केईएम रुग्णालयामध्ये शुक्रवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास एका 25 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद लोहार असे त्या तरुणाचे नाव असून त्याला रक्ताचा कर्करोग झाला होता.

अरविंद हा डोंबिवली येथे राहणारा होता. रक्ताच्या कर्करोगाने त्रस्त असल्याने अरविंद गेल्या एक महिन्यापासून केईएम रुग्णालयात 42 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये उपचार घेत होता. मात्र शुक्रवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्याने हेमेटोलॉजी विभागाच्या रुग्ण कक्षाबाहेरील जागेमध्ये असलेल्या पाईपलाईनला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाला कळताच त्यांनी तातडीने भोईवाडा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आजाराला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.