केन विल्यमसनची ब्रिगेड मैदानात उतरणार, न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंच्या सरावाला सुरुवात

395

कोरोनापासून मुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये लवकरच क्रिकेटपटूंच्या सरावाला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून सोमवारी याबाबत माहिती देण्यात आली. या आठवडय़ात न्यूझीलंडमधल्या अव्वल खेळाडूंच्या सरावाला लिनकोल्न येथे सुरुवात होईल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आले. कर्णधार केन विल्यमसनची ब्रिगेड मैदानात उतरणार हे यामुळे निश्चित झाले आहे.

लिनकोल्न येथे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे हाय परफॉर्मन्स सेंटर आहे. येथे या आठवडय़ापासून क्रिकेटपटूंच्या सरावाला सुरुवात होणार आहे. या सरावात न्यूझीलंड संघासाठी खेळणाऱया अव्वल पुरुष व महिला क्रिकेटपटूंचा समावेश असणार आहे, अशी माहिती पुढे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली.

खेळाडूंसाठी सहा सराव शिबिरे

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूंच्या सरावासाठी सहा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या शिबिरात अव्वल खेळाडूंचा समावेश असणार आहे. दक्षिण आइसलॅण्ड व वेलिंग्टनमधील ब्लॅक कॅप्स व व्हाईट फर्न्स यांच्यासाठी कॅन्टरबरी येथे तर नॉर्थमधील खेळाडूंसाठी माऊंट मॉनगनुई येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या