विद्यार्थ्यांनी जंगलात आयोजित केली ‘सेक्स पार्टी’, शरीरसंबंध ठेवताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केनियाच्या मुरंगा भागात शाळकरी मुलांना दारू पिताना आणि शरीरसंबंध ठेवत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मुले आणि मुली अशा मिळून 16 जणांना अटक केली आहे. जंगलामध्ये सेक्स पार्टी आयोजित करणाऱ्या काही संशयित विद्यार्थ्यांचा पोलीस अद्यापही शोध घेत आहेत.

केनियातील गिटीटू भागात असलेल्या या शाळेला सध्या तिथल्या स्थानिक उत्सवांमुळे सुट्टी देण्यात आली आहे. इथे शिकणाऱ्या मुला-मुलींना घरी जाऊन उत्सव साजरा करता यावा यासाठी त्यांना ही सुट्टी देण्यात आली होती. मात्र घरी जाण्याऐवजी काही विद्यार्थ्यांनी जंगलात जाऊन सेक्स पार्टी आयोजित करण्याचं ठरवलं होतं. काही विद्यार्थ्यांनी एका बारमध्ये ही पार्टी ठेवली होती तर काहींनी जंगलात ही पार्टी ठेवली होती.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका बंद बारमध्ये शरीरसंबंध ठेवत असलेले 10 विद्यार्थी सापडले आहेत. इतर विद्यार्थी हे जवळच्या जंगलात शरीरसंबंध ठेवत असताना पकडण्यात आले. या सगळ्या विद्यार्थ्यांना मकायू पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांचे पालक आणि शिक्षक शोधून काढून त्यांना हा सगळा प्रकार सांगण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.