केरळमध्ये पावसाचा हाहाकर, 18 जणांचा मृत्यू; बचावकार्यासाठी सैन्याची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमध्ये पावसाचा हाहाकर, 18 जणांचा मृत्यू; बचावकार्यासाठी सैन्याची मदत
केरळमध्ये शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यातील डोंगरी भागात भुस्खल झाल्याने 22 जण बेपत्ता झाले आहेत.

केरळमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून राज्य सरकारने बचाव कार्यासाठी सैन्यालापाचरण केले आहे. या पावसामुळे अनेक जण जखमी झाले असून राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात पावसामुळे परिस्थिती बिगडल्याने मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी रात्री आपात्कालीन बैठक बोलावली होती. राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. लोकांना वाचवण्यसाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असून बचावकार्यासाठी लष्कर, नौदल आणि वायुसेनेकडे मदत मागितल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाचा सर्वाधिक फटका कोट्टायम, पथानामथिट्टा आणि इडुक्की या तीन जिल्ह्यांना बसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


इडुक्की जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे एक कार वाहून गेली होती. त्यापैकी दोन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून पठानमथिट्टा आणि कोट्टायम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.