
सामना ऑनलाईन । तिरुअनंतपूरम
केरळमध्ये पावसाचा कहर सुरू असून एर्नाकुलम, त्रिशूर,पठानमथिट्टा, मलप्पूरम जिल्ह्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. मलप्पूरम आणि कोझीकोडला जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. केरळमध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
Kerala State Disaster Management Authority (KDSMA): 22,165 people have been evacuated to safety and lodged in 315 camps across the state. #KeralaRains pic.twitter.com/x8ZLii00OM
— ANI (@ANI) August 9, 2019
अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.तसेच अतिवृष्टीमुळे 11 ऑगस्टपर्यंत कोच्ची विमानतळावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. केरळच्या इडुक्की, मलप्पूरम, कोझीकोडमध्ये पावसाचा रेड अलर्ट तर त्रिशूर, पलक्कड, वायनाड आणि कासरगोडमध्ये पावसाचा आँरेंड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच केरळमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मासेमारांना समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहे. केरळच्या आपत्ती निवारण पथकांकडून पूरग्रस्त भागातून आतातपर्यंत 22,165 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यात 315 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत.
पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिले आहे. वायनाडमध्ये पूराचा सर्वाधीक फटका बसला असून पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत असल्याचे विजयन यांनी सांगितले. रात्रीनंतर पावसाचा जोर वाढल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत. मलप्पूरम आणि इडुक्की भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पूरग्रस्त भागात खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी पोहचवण्यात येत आहे. केरळमधील काही भागात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.























































