
>> ओडियान लक्ष्मणन, आदिवासी कार्यकर्ते
केरळच्या अतिदुर्गम अशा मुरुगुला गावात कोरोनाची लक्षणे असणारे आदिवासी रुग्ण असल्याचे समजल्यावर आरोग्य कर्मचारी या गावात पोहोचले होते. मात्र या गावात जाण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने वाहती नदी, घनदाट जंगलातून मार्ग काढत 8 किमी पायी रस्ता पार करत आरोग्य कर्मचाऱयांनी आपले कर्तव्य बजावले. रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी या कर्मचाऱयांना कंबरभर पाण्यातून वाट काढावी लागली. आरोग्य पथकात असणाऱया डॉ. सुकन्या, आरोग्य निरीक्षक सुनील वासू, वाहन चालक सादेश यांच्या कामाचे केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी फोनवरून काwतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कोरोनाचा कहर रोखण्यासाठी केरळ सरकारने सर्वच भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डोमिकिले केअर सेंटर (डीसीसी) सारखी योजना आणली आहे. त्याद्वारे सर्वांवर उपचार केले जात आहेत. कोविडचा संसर्ग आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी केरळ सरकारने गेल्या वर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून आरोग्य व्यवस्थेत अनेक अंतर्गत बदल केले आहेत.
एसओएस कॉल मिळाल्यानंतर पुथूर डोमिकिले केअर सेंटर (डीसीसी)मधील वैद्यकीय पथक दुर्गम भागात कसे पोहोचायचे याची चिंता न करता जिद्दीने पलक्कडमधील अटापडीपासून 20 किमी अंतरावर असलेल्या आदिवासी भागात असलेल्या इरुला, मुडूगर आणि कुरुंबा जमातीची 100 नागरिक असलेल्या गावात पोहोचले.
एका कुटुंबातील तीन जणांना जास्त ताप आला होता आणि त्यांना त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची गरज होती. तिथे पोहोचल्यावर त्यांनी 30 जणांची कोरोना चाचणी केली. त्यापैकी सात जणांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना पुथूर डीडीसीमध्ये हलविण्यात आले.



























































