इर्शाळवाडी दुर्घटना : बचावकार्यासाठी जात असताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

खालापूरमधील इर्शाळगडाजवळील इर्शाळवाडी डोंगर कोसळून त्याच्या चिखलाखाली गाडली गेली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या ठिकाणी बचाव कार्यासाठी जात असलेल्या एका जवानाचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या जवानाचा मृत्यू कसा झाला ते अद्याप समोर आलेले नाही.