कपिल शर्माने निहंग शीखांची जाहीर माफी मागावी, अन्यथा…; हरदीप सिंग लड्डी असे का म्हणाला?

कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅफेवर नुकताच हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी हरजीत सिंग लड्डी याने घेतली आहे. हा खलिस्तानी दहशतवादी असून, तो बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेसाठी काम करतो. लड्डी हा कॅनडामध्ये बसून हिंदुस्थानात दहशतवादी कारवाया राबवत असतो. लड्डीने कपिल शर्मावर निहंग शिखांच्या पोशाखाची खिल्ली उडवल्याचा आरोप केला असून, त्याने सार्वजनिकरित्या माफी मागितली नाही तर गंभीर परिणाम भोगण्यास तयार राहा अशी धमकी  त्याने दिलेली आहे.

कॅनडामधील कपिल शर्माच्या रेस्टॉरंटमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर, याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली आहे. हरजीत सिंग लड्डी हा बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. तो पाकिस्तानमध्ये आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करतो.

टार्गेट किलिंग व्यतिरिक्त, त्याने अनेक मोठे दहशतवादी हल्ले केले आहेत. तसेच तो अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड देखील आहे. पोलिसांच्या मते, हरजीत सिंग लड्डी हा हिंदुस्थानविरुद्ध आयएसआयच्या इशाऱ्यावर पाकिस्तानमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडासोबत काम करत आहे. 2024 मध्ये एनआयएने हरजीत सिंग लड्डीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते आणि तो एनआयएच्या यादीतील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.

काही दिवसांपूर्वी कपिल शर्माने निहंग शिखांच्या पोशाखाची खिल्ली उडवली होती असा हरजीत सिंग लड्डीने दावा केला आहे. यामुळे त्याने संतापून कपिल शर्माच्या कॅफेवर गोळ्या झाडल्या. कपिल शर्माने जाहीरपणे माफी मागितली नाही तर,  त्याचे परिणाम आणखी वाईट होतील, असेही त्याने म्हटले आहे.