
खटाव तालुक्यातील अंबवडे येथे येरळवाडी धरणाच्या भरावाच्या ठिकाणी वाळूउपसा करणाऱयांवर वडूज पोलिसांनी छापा टाकून जेसीबी, डंपर, ट्रक्टर असा 54 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल केला असून, पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
अन्वर शेख, सुशीलकुमार डोईफोडे, सोमनाथ भोसले, विलास सुर्वे, नीलेश जाधव, किशोर बागल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अंबवडे येथील येरळवाडी धरणाच्या भराव क्षेत्रालगत बेकायदेशीर वाळूउपसा सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली होती. देशमुख यांनी पथक तयार करून मध्यरात्री तेथे छापा टाकला असता वाळूउपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. यादरम्यान पोलिसांनी एक जेसीबी, दोन डंपर, एक ट्रक्टर असा सुमारे 54 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱया कारवाईत सि. कुरोली येथील मोडे नावाच्या शिवारात स्वप्नील इंदापुरे हा बेकायदेशीर वाळू उपसा करत आढळून आला. पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, दादासाहेब देवकुळे, भूषण माने, अण्णा मारेकर, संदीप शेडगे, सत्यवान खाडे, दीपक देवकर, होमगार्ड जाधव, पवार, आनंदा कदम, सागर बदडे, दयाबा नरळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.




























































