
मुंबई गोवा महामार्गावरील लवेल नजीकच्या एका धाब्याजवळ खेड पोलीसांनी कारवाई करून गांजा विकण्यासाठी आलेल्या इसमास मुद्देमालासह ताब्यात घेतले. इत्सियाक कादीर असे या 48 वर्षीय संशयीताचे नाव असून त्याच्याकडून पोलिसानी 514 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे .
या परिसरात घाणेखुंट गवळीवाडी येथील एकजण पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिका कारमधून गांजा विकण्यासाठी येणार असल्याची खबर खेड पोलिसांना मिळाली होती . या नुसार पोलिसानी केलेल्या कारवाईत 7500 रूपयांचा गांजा ‘ इंडिका कार , मोबाईल असा 50 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी सुसेरी नं 2 येथे एका घरावर धाड टाकून अवैध देशी- विदेशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तिस अटक करण्यात आले असून तुषार तानाजी बावकर असे त्याचे नाव आहे . लॉक डाऊन चा फायदा घेत तुषार हा आपल्या घराच्या मागील मोकळ्या जागेत चढ्या भावाने मद्यविक्रि करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती . खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरिक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अे.पी.आय सुजीत गडदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली






















































