खेड – कशेडी घाटात दुचाकीला अपघात, दोघे गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कशेडी घाटातील अवघड वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. हे दोघेही नांदीवली येथे असून महेश राजेंद्र कदम (27) आणि उमेश सुधाकर शिरवळकर (30) अशी दोघांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात पडला.

महेश आणि उमेश हे दोघे दुचाकीने पुण्याहा खेडला यायला निघाले होते. कशेडी घाट उतरत असताना एका अवघड वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले ती दुचाकी दरडीवर आदळल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. सदगुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या रुपाचाहिकेचे चालक मुकुंद मोरे यांनी तात्काळ या दोघांना कळंबणी येथील रुग्णालयात दाखल केले.