खेतवाडीत साकारली अजिंठा लेणी

गणेशोत्सवात अनेक मंडळे नयनरम्य देखावा साकारतात. हे देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यंदा मुंबईच्या अनंत नावाने प्रसिद्ध असलेल्या खेतवाडी तेरावी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अजिंठा लेणीचा देखावा साकारला आहे. कलादिग्दर्शक सुरेश माथुर यांनी हा देखावा साकारला आहे. मंडळाच्या बाप्पाची मूर्ती 16 फुटांची असून अमरनाथ महादेव रूपात आहे. ही सुबक मूर्ती अरुण दत्ते यांनी साकारली आहे. गणेशोत्सवा व्यतिरिक्त मंडळातर्फे वर्षभर सामाजिक उपक्रम राबवले जातात, अशी माहिती मंडळाचे सचिव चंदन माने यांनी दिली.