भूल भुलैया 2 या चित्रपटात दिसणार कियारा

795

एमएस धोनी चित्रपटात दिसलेली आणि कबीर सिंग चित्रपटामुळे बरीच प्रसिद्ध झालेली अभिनेत्री कियारा आडवाणी हिला आता बऱ्सयापैकी चित्रपटांच्या ऑफर मिळायला लागल्या आहेत. ‘गुड न्यूज’ और ‘लक्ष्मी बम’ या चित्रपटानंतर भूल भुलैया 2 या सिक्वेल चित्रपटामध्ये कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि किआरा आडवाणी ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना कियाराने म्हटलंय की अक्षय कुमार, विद्या बालन आणि शायनी आहुजाची भूमिका असलेलाभूल भुलैया हा कॉमेडी हॅारर चित्रपट तिला प्रचंड आवडला होता. साहजिकच आहे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात काम करताना तिला आनंद झाला आहे. हा चित्रपट ‘कबीर सिंग’चे निर्माता भूषण कुमारच हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. भूषण कुमार यांनी भूल भुलैया-2 बाबत बोलताना सांगितले की ‘जेव्हा मी या चित्रपटाबद्दल सोशल मिडीयावर पोस्ट केली तेव्हा प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. या पोस्टमधील कार्तिकचा लूक सर्वाना आवडला आहे.’ भूषण कुमार यांनी कियाराने कबीर सिंग या चित्रपटात केलेल्या कामाचे खूप कौतुक केले आहे.  भूल भुलैया-2 मध्ये देखील कियारा उत्तम काम करेल यात शंका नाही असं भूषण कुमार म्हणाले आहेत.

निर्माता मुरड खेतानी यांनी कियाराबाबत बोलताना सांगितले की ‘कबीर सिंगच्या शूटिंग दरम्यान सगळ्या टीमसोबत तिचे उत्तम ट्युनिंग जमले होते. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.’ भूल भुलैया 2 हा चित्रपट 31 जुलै 2020 ला प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या