
मूल होत नसल्यामुळे आईच्या कुशीत झोपलेल्या एक वर्षीय चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या दोन्ही सख्या बहिणींसह भावजीला हडपसर पोलिसांनी अटक केले. सोमवारी पहाटेच्या सुमारास हडपसरमधील गाडीतळ पुलाखालून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी अपहरणकत्र्यांनी बाळाला सोडून दिल्यामुळे चिमुकला पुन्हा एकदा आईच्या कुशीत विसावला आहे. बाळ सापडल्यामुळे आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले.
पंचशीला तिपन्ना मेलीनकेरी (वय 33, रा. बिदर कर्नाटक) आणि वैशाली तुळशीराम सोनकांबळे (वय 41) केरनाथ नागनाथ सूर्यवंशी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पतीसोबत वाद झाल्यामुळे शर्मिला नीलेश काळे हडपसरमधील गाडीतळ पुलाखाली काही ओळखीच्या महिलांसोबत राहत होती. सोमवारी पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असताना दोन महिलांनी त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला उचलून नेत अपहरण केले होते. त्यानंतर शर्मिला यांनी शोध घेऊनही बाळ न सापडल्यामुळे त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास तक्रार दिली. त्यानंतर हडपसरमध्ये मुलाचा शोध सुरू केला होता. त्यानंतर तिघाजणांना पोलिसांनी अटक केले.
पंचशीलाला मूल होत नसल्यामुळे तिने पूलाखालील चिमूरड्याचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, विनोद शिवले, समीर पांडुळे, संदीप राठोड, अकबर शेख, शशिकांत नाळे, शाहीद शेख, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत धुमाळ, उमाकांत स्वामी यांच्या पथकाने केली.





























































