किल्लारी पाटी येथे एकाच रात्री सहा दुकाने फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। किल्लारी

किल्लारी पाटी येथे रविवारी 25 रोजी रात्री अज्ञात एकाच चोराने 6 दुकाने फोडल्याची घटना घडली. किल्लारी पाटी येथील जिडगे किराणा, राहुल पाईप एजन्सी, लड्डा एजन्सी, गौरी मेडीकल, साई लॅब, वैष्णवी मोबाईल शॉपी या दुकानदारांनी सकाळी आपले दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

या संदर्भात पोलीस यंत्रणेस आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद भोसले यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर आणखी काही ठिकाणी घटना घडली आहे का यासाठी संपुर्ण बाजारपेठेची पाहणी करण्यात आली. तसेच किल्लारी पोलीस ठाण्याचे गणेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यातील काही दुकानात कॅमेरे बसवले असल्याने त्या कॅमेरात भुरट्या चोराचा फुटेज मिळाला आहे. त्यानुसार किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरू आहे.