
किनगाव येथील सावरकर चौकामध्ये किनगाव पोलिसांनी एक गुटख्याचा टेम्पो पकडला. सुमारे 18 लाख रुपयांचा गुटखा आणि 7 लाख रुपयांचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
भरधाव वेगात येणारा टेम्पो क्रमांक एम.एच.04 जेके 9693 हा नगर येथून अहमदपूरकडे येत होता. अशोक रामभाऊ शेंडगे रा.होळ ता. केज या चालकास थांबवले आणि टेम्पोची झडती घेतली असता तब्बल 18 लाख रुपयांचा गुटखा निदर्शनास आला.
गुटखा आणि टेम्पो जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक जिलानी मानुल्ला, व्ही.एम.सोनवणे हे करीत आहेत.

























































