भांडुपगावात भव्य किर्तन महोत्सव

देशप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम व संस्कृती टिकून एकात्मता नांदावी या उद्देशाने प्रतिवर्षाप्रमाणे भागवताचार्य गुरुवर्य ह.भ.प. संतोष महाराज सावरटकर यांच्या प्रेरणेने भव्य किर्तन महोत्सव, श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भांडुपगाव वारकरी संप्रदायाच्यावतीने आयोजित हा महोत्सव 7 ते 11 जानेवारी या कालावधीत दिना बामा पाटील रंगमंच, भांडुपगाव (पूर्व) येथे होणार आहे.

महोत्सवाच्या उद्धाटनावेळी शिवसेना नेते – खासदार संजय राऊत, खासदार संजय दिना पाटील, आमदार सुनील राऊत, कामगार नेते परशुराम कोपरकर, माजी नगरसेविका सारिका पवार, विठ्ठल चाहू पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, उपशहरप्रमुख गणेश दगडे विलास तुपे आदींच्या हस्ते कलश पुजन, दीपप्रज्वलन, वीणा पुजन, व्यासपीठ पुजन करण्यात येणार आहे. यावेळी ह. भ. प. शिवा महाराज बावस्कर, ह. भ.प. कविराज महाराज झावरे, ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले तर संत कथा प्रवत्ते ह.भ.प. संबळे, ह.भ.प. अविनाश महाराज जाधव, ह.भ.प. किरण महाजन पुंभार, ह.भ.प. दत्ता महाराज कोलगुडे,  ह.भ.प. केशव महाराज पुंभार, ह.भ.प. ऋषिकेश महाराज शिंदे , ह. भ.प. सोमनाथ महाराज शेलार आपली पाच दिवस सेवा देऊन प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष ह.भ.प. विनोद माऊली शिंदे, उपाध्यक्ष ह.भ.प.शिवाजी माऊली पाळसे, सचिव ह.भ.प. दत्ताराम माऊली पालेकर यांनी दिली.