शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरू व्हायच्या आधीच दडपशाही केल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kisan-march1
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

डॉ. अजित नवले यांच्याविरुद्ध सरकार व पोलिसांनी गेले सात दिवस उगारलेल्या दडपशाहीच्या हत्याराचा अखिल भारतीय किसान सभा जळजळीत निषेध करीत आहे, असे किसान सभेकडून सांगण्यात आले.

आज सकाळपासून ठाणे-पालघर जिल्ह्यातून नाशिकला येणाऱ्या हजारों शेतकऱ्यांना पोलिसांनी जव्हार, डहाणू, कासा, धुंदलवादी, विक्रमगड अशा ठिकाणी अडवले. दोन तास लोकांनी खूप संघर्ष केल्यावर आता हळूहळू काही वाहनांना पोलिसांना सोडावे लागले. नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनाही पोलीस गेले काही दिवस प्रचंड त्रास देत आहेत. या दडपशाही बद्दलही सरकार आणि पोलिसांचा अखिल भारतीय किसान सभेतर्फे तीव्र निषेध, करतो असेही यावेळी सांगण्यात आले.

शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे हेच देशाच्या जनतेसमोर आल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.