
हिंदुस्थानच्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या, ताजा स्वच्छ भाजीपाला, फळे आणि मधल्या वेळेत खाण्यायोग्य घरगुती खाद्यपदार्थ विकणाऱ्या, फार्म टू किचन ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या शेतकरी आणि किसान कनेक्ट बंधूंनी ग्राहकांना अस्वच्छ भाजीपाला खरेदीतून मुक्त करण्याची प्रतिज्ञा यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने घेतली. किसानकनेक्टच्या शेतकऱ्यांनी ‘अ न्यू डाऊन ऑफ फ्रीडम’ लॉन्च करत या नवीन शैक्षणिक उपक्रमातंर्गत ग्राहकांना अस्वच्छ भाजीपाला आणि फळे स्वातंत्र्य, वाढत्या दरापासून स्वातंत्र्य तसेच अल्प-पोषक अन्नपदार्थापासून स्वातंत्र्य देण्याची प्रतिज्ञा केली.
आजच्या काळात अन्न सुरक्षेचे मोठे आव्हान सर्वांसमोर उभे आहे. खरेदीदारांची अनेक प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्तता करणे,तसेच सुरक्षित कापणी आणि हाताळणी पद्धतींचा अवलंब करण्याची प्रतिज्ञा श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. प्रत्येक वयोगटाला डोक्यात ठेवून स्वयंपाक तयार करणे, वाढणे आणि साठवून ठेवण्याच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण पदार्थ साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता शेतकरी वर्ग झटत असतो. आपल्याला मिळालेल्या ऑर्डरकरिता विशेष प्रकारचे बास्केट पॅक सादर करण्यात आले. भाजी आणि फळांची चांगल्याप्रकारे साठवणूक करण्याचे पर्याय तसेच सुरक्षित पर्यावरणाची खातरजमाया माध्यमातून करण्यात येते.
किसानकनेक्टचे शेतकरी आपल्या शेतात सर्वोत्तम आणि सुरक्षित कापणी पद्धतींचा अवलंब करण्यासाठी ओळखले जातात. त्याप्रमाणे ग्राहकांना विकण्यात येणाऱ्या भाजी-फळांचा चांगला परिणाम मिळावा यादृष्टीने अनेक अन्नपदार्थ खरेदी आणि हाताळणीची तंत्र देखील यापुढे शिकविण्यात येणार आहेत. आपल्या अन्नपदार्थांतून अधिकाधिक पोषक तत्त्वे मिळवीत म्हणून डिलिव्हरीसोबत अन्न संरक्षण आणि सेवन सवयींवर आधारित छापील साहित्य देण्यात येणार आहे. ग्राहकांच्या खिशाला परवडणारे दर ठेवण्याकरिता शेतकरी वर्गाची धडपड सुरू आहे.





























































