
आपल्या किचनमध्ये अनेक पदार्थांची मेजवानी घडत असते. अशावेळी किचन स्वच्छतेकडे थोड्या फार प्रमाणात का होईना दुर्लक्ष होते. किचन स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. किचनमधील जुनाट चिकट डागांवर काही जालिम उपाय शोधणं हे खूप गरजेचं आहे. मुख्य म्हणजे किचनची स्वच्छता करताना कुठलीही महागडी स्वच्छतेची उत्पादने न वापरता, आपण काही छोट्या पण गरजेच्या वस्तूंचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. ज्या वस्तू सहजपणे उपलब्ध आहेत अशा वस्तू किचनच्या स्वच्छतेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
Kitchen Cleaning Tips- काळाकुट्ट करपलेला तवा चमकवण्यासाठी आता फक्त एक चमचा ही वस्तू गरजेची, वाचा
किचनमधील बेसिनचा परिसर हा अनेकदा डागांनी व्यापलेला असतो. अशावेळी या डागांवर उत्तम उपाय म्हणजे काय ते आपण बघूया.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा स्वच्छतेमध्ये सर्वाधिक वापरला जातो आणि तो खूप प्रभावी देखील आहे. किचनमधील नळ किंवा स्टीलचे नाॅब यावर डाग पडले असतील तर, बेकिंग सोडा नक्की वापरुन बघा. बेकिंग सोड्यात लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा आणि त्याने नळ स्वच्छ करुन बघा. या उपायाने तुमचे स्वयंपाकघर पूर्वीपेक्षा जास्त चमकू लागेल.
व्हिनेगर
नळ किंवा स्वयंपाकघरातील इतर भाग स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर हा सर्वोत्तम उपाय आहे. व्हिनेगरमुळे अगदी जुनाट डागही लगेच निघण्यास मदत होते. यासाठी एका भांड्यात व्हिनेगर आणि पाणी घालून द्रावण तयार करा आणि स्क्रबच्या मदतीने ते स्वच्छ करा.
लिंबाचा वापर
नळावरील घाण आणि डाग काढून टाकण्यासाठी लिंबाचा रस हा आजपर्यंतचा सर्वोत्तम उपाय आहे. लिंबाचा वापर करून तुम्ही कोणतीही घाण सहजपणे साफ करू शकाल आणि वास देखील दूर करू शकाल. लिंबाच्या रसात मीठ मिसळा आणि नळाला 10 मिनिटे घासून धुवा.