
सामना ऑनलाईन । रत्नागिरी
गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कोचिवली एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने ही गाडी करबुडे बोगद्यात अडकली आहे. पाऊणतासाहून अधिक काळ गाडी बोगद्यात अडकल्याने बोगद्यात जमा झालेल्या धुराने श्वासकोंडला गेल्याने पाच प्रवाशांना त्रास झाल्याची माहिती मिळते आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसारित केले.
कोकण रेल्वेच्या मार्गावर असलेला करबुडे बोगदा 6,506 मीटर लांबीचा आहे. या बोगद्यात असताना कोचिवली एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड आणि गाडी अडकून पडली. तब्बल पाऊणतास गाडी या बोगद्यात उभी असल्याने पाच प्रवाशांना साचलेल्या धुरामुळे त्रास झाल्याचे समजते.





























































