
गाऱहाण्यासोबतच देवाला लावण्यात येणाऱया कौलाने कोणतेही कार्य करण्यास शुभसंकेत मिळत असल्याची कोकणवासीयांची श्रद्धा आहे. यामध्ये अक्षता, भाताचे दाणे, सुपारीची साल, आंब्याचे पान देवाच्या मूर्तीवर लावून आपण करीत असलेल्या कामाला यश मिळण्यासाठी ‘उजवा कौल’ द्यावा, असे सांगणे देवतेला केले जाते. यावेळी ‘उजवा कौल’ मिळाल्यास आपण योजलेले काम करण्यास देवाची परवानगी आहे असे मानले जाते.
लग्न असो वा नोकरी, घर खरेदी असो किंवा आर्थिक अडचण… इतकेच काय कुटुंब पिंवा स्वतःवर आलेल्या संकटातून वाचण्यासाठी कोकणात सर्वात पहिल्यांदा करण्यात येणारी प्रार्थना म्हणजे देवाला घालण्यात येणारे गाऱहाणे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवातही कोकणात आपल्या देवतेला मनोभावे गाऱहाणे घालूनच होते. ‘बा, देवा महाराजा… रामेश्वर महादेवा… तूच आमची रखवाली कर!’, अशी प्रार्थना यामध्ये केली जाते. कोकणच्या या ऐतिहासिक परंपरेला शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा आहे.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणाला सांस्कृतिक परंपरेसोबत धार्मिक परंपरेचे देणं लाभलेले आहे. या कोकणच्या परंपराही तितक्याच लक्षवेधक आहेत. यामध्ये देवाला घालण्यात येणाऱया गाऱहाण्याचे विशेष महत्त्व आहे. कुठल्याही कार्याची सुरुवात गाऱहाण्यानेच होते असे आचरा येथील कपिल गुरव यांनी सांगितले. आचरा येथील रामेश्वर मंदिरातदेखील संपूर्ण वर्षभर अशाच प्रकारे भाविकांची रीघ लागलेली असते असे ते म्हणाले.
होय रे देवा महाराजा!
बा देवा रामेश्वर महाराजा, ह्या तुझा लेकरू तुझ्या भेटीसाठी, दर्शनासाठी इला आसा. त्यांनी तुझ्यासमोर भेटीचा भरलेला श्रीफळ ठेवलेला आसा. ता तू मान्य करून घे. त्याचे इच्छा, आकांशा, हेतू परिपूर्ण कर. त्यांच्या कुटुंबांचा, मुलाबाळांचा संरक्षण कर, विद्याअभ्यासात यश दे. त्यांची शिक्षणात प्रगती कर. नोकरीधंद्यात यश दे.त्यांच्या घरच्या देवाची, गावच्या देवाची कुटुंबावरची रखवाली आधारून त्यांच्या कल्याण करण्यात राजी हो…
असे गाऱहाणे घातले जाते. याच्या प्रत्येक मागणीनंतर ‘होय रे महाराजा’ असे एकसुरात बोलून गाऱहाण्यात सहभागी होण्यात येते.
इच्छापूर्तीनंतर नवसफेड!
कोकणातील देवळामध्ये तेथील पुजारी गुरवांच्या माध्यमातून देवतेपुढे गाऱहाणे सांगण्याची प्रथा आहे. पुजारी गुरवाच्या माध्यमातून आपल्या मनातील मागण्या, प्रश्न देवासमोर मांडले जातात. यानंतर आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर देवाला केलेला नवस फेडण्यात येतो.
























































